आढावा
डॉ. श्रीकांत शिंदे हे युवासेनेचे धोरणात्मक दिशादर्शक म्हणून विशेषतः शहरी भागात महत्वाची भूमिका बजावतात. कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार म्हणून कार्यरत असून ते राष्ट्रीय पातळीवरील पक्षाची ध्येय धोरण आखणे आणि तळागाळातील युवकांचे संघटन बळकट करणे हे त्यांचे प्रमुख कार्य आहे. मुंबई व ठाणे लोकसभा संपर्क प्रमुख म्हणून ते कार्यरत आहेत.
त्यांच्या नेतृत्वामुळे युवा सेनेच्या उपक्रमांना व्यापक दृष्टी, सक्षम नियोजन आणि परिणामकारक अंमलबजावणी मिळते. युवकांच्या प्रश्नांना राष्ट्रीय व्यासपीठावर मांडत असताना, स्थानिक पातळीवर त्यांच्या सशक्तीकरणासाठी ते सातत्याने कार्यरत आहेत.